*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
August 31, 2025
0
*26 ते 30 ऑगस्ट - 2025*
🔖 *प्रश्न.1) अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये मीराबाई चाणूने कोणते पदक जिंकले ?*
*उत्तर -* सुवर्ण पदक
🔖 *प्रश्न.2) BCCI चे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ?*
*उत्तर -* रॉजर बिन्नी
🔖 *प्रश्न.3) रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर BCCI चे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले आहेत ?*
*उत्तर -* राजीव शुक्ला
🔖 *प्रश्न.4) भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे ?*
*उत्तर -* CISF
🔖 *प्रश्न.5) FSSAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* रजित पून्हानी
🔖 *प्रश्न.6) भारतीय सैन्याने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित केला ?*
*उत्तर -* आसाम
🔖 *प्रश्न.7) अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आलेले आहे ?*
*उत्तर -* राजस्थान
🔖 *प्रश्न.8) सोळाव्या आशियाई नेमबाज स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर समराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कोणते पदक जिंकले ?*
*उत्तर -* सुवर्णपदक
🔖 *प्रश्न.9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 'मेक इन इंडिया' बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ' ई-वितारा चे व हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रो प्लांट चे उद्घाटन केले ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.10) भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोप-वे ची चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली ?*
*उत्तर -* वाराणसी
🔖 *प्रश्न.11) पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?*
*उत्तर -* कॅंडी
🔖 *प्रश्न.12) कोणत्या अंतराळ संस्थेने SURYA नावाचे अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले आहे ?*
*उत्तर -* NASA
🔖 *प्रश्न.13) न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* राजीव रंजन
🔖 *प्रश्न.14) ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* श्रीनिवासन के. स्वामी
🔖 *प्रश्न.15) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.16) प्रेमचंद पूख्रम्बम यांना ललित अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्याचे आहे ?*
*उत्तर -* मणिपूर
🔖 *प्रश्न.17) चर्चेत असलेला यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या दोन राज्या मधला आहे ?*
*उत्तर -* हरियाणा व राजस्थान
🔖 *प्रश्न.18) अलीकडील अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* चंद्रबाबू नायडू
🔖 *प्रश्न.19) नुकतेच महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ?*
*उत्तर -* 3500
🔖 *प्रश्न.20) लिथूआनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ?*
*उत्तर -* इंगा रुगीनीन
🔖 *प्रश्न.21) ड्युरंड कप 2025 कोणत्या संघाने जिंकले आहे ?*
*उत्तर -* North East United
🔖 *प्रश्न.22) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* झुरीच
🔖 *प्रश्न.23) महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 26 ऑगस्ट
🔖 *प्रश्न.24) जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 27 ऑगस्ट
🔖 *प्रश्न.25) दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 29 ऑगस्ट