🛑 नवी मुंबई विमानतळ 🛫
✅ नाव: लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅ पूर्ण नाव : दिनकर बाळू पाटील उर्फ दि. बा. पाटील
✅ स्थळ : उल्वे, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
✅ प्रकार: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प
✅ संस्था: नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (NMIAL) — अडाणी ग्रुप व CIDCO यांच्या संयुक्त मालकीचा प्रकल्प
✅ उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी होणार
✅ उद्दिष्ट: मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करणे आणि महानगर प्रदेशाला दुसरा मोठा हवाई तळ उपलब्ध करणे
✅ प्रकल्पाचे फायदे :
विकासाला गतीः
विमानतळ प्रकल्पामुळे उत्पन्न, रोजगार, रिअल इस्टेट आणि व्यवसाय संधींना नवीन गती मिळेल.
बहुविध वाहतूक केंद्रः
भारताचे पहिले परिपूर्ण मल्टिमोडल विमानतळ, ज्यामुळे लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल.
प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता २० दशलक्ष (टप्पा-१) व ९० दशलक्ष (अंतिम टप्पा)
प्रती वर्ष मालवाहतूक क्षमता ०.८ दशलक्ष मेट्रिक टन (टप्पा-१) व ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन (अंतिम टप्पा)
महाराष्ट्रासह देशातील स्थानिक व प्रादेशिक सांस्कृतिक वारशाचा प्रभावी अनुभव प्रदान करण्याकरिता डिजिटल व भौतिक कला प्रदर्शन
पारंपरिक भारतीय वास्तुकला आणि अत्याधुनिक स्थापत्याचा डौल व कार्यक्षमता यांचे अनोखे मिश्रण असणारी 'कमळ' प्रेरित प्रवासी टर्मिनल इमारतीची रचना
दोन स्वतंत्र धावपट्टयांसह प्रत्येक धावपट्टीकरिता दोन समांतर टॅक्सी वे
एकूण क्षेत्रफळ - ११६० हेक्टर
द्रुतगती महामार्ग, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, वॉटर टॅक्सी, इत्यादींद्वारे कनेक्टिव्हिटी लाभलेले देशातील पहिले बहुउद्देशीय विमानतळ
भविष्यातील तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण करून किरकोळ खरेदी, अन्न व पेय, ड्युटी फ्री खरेदी, सुलभ बॅग हाताळणी आणि लाउन्ज चेक-इन इत्यादीकरिता डिजिटल सेवांची सुलभ उपलब्धता
🛑 नवी मुंबई विमानतळ 🛫
October 14, 2025
0